‘… अन्यथा माझ्या हातून त्यांचा मर्डर होईल ‘; माजी राज्यमंत्र्याची संभाजी भिडेंना जीवे मारण्याची धमकी

Buldhana – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide )यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. “भिडे गुरुजींना अटक करा. अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल”, अशी धमकी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिली आहे. सुबोध सावजी यांनी गृहमंत्र्यांना निवेदन देऊन भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली.Tv9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, अन्यथा त्यांचा मी मर्डर करेन, अशी धमकी बुलढाणा येथील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिलीय. तसे एक निवेदन सुद्धा सावजी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहे. जर आपण भिडेंवर कारवाई केली नाही तर याची जबाबदारी आपली राहील, असा इशारा सावजी यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.