राजकारण करत असताना कार्यकर्त्यांना सामाजिक भान असणे महत्वाचे आहे – विजया रहाटकर

पुणे : ”महाराष्ट्राने अनेक सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरे पाहिली. राजकारण करत असताना कार्यकर्त्यांना सामाजिक भान असणे महत्वाचे आहे,” असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस विजया रहाटकर यांनी केले. विनोद धोत्रे परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या ‘दिवाळी सरंजाम’ वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजपचे नवनिर्वाचित सरचिटणीस व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विनोद धोत्रे, गौरव धोत्रे उपस्थित होते.

रहाटकर पुढे म्हणाल्या, ”कोरोनाच्या दोन वर्षाच्या सावटानंतर पहिल्यांदाच सर्वजण मोठ्या आनंदात दिवळी सण साजरा करत आहेत. या आनंदी वातावरणात विनोद धोत्रे यांनी राबविलेला सरंजाम वाटपाचा कार्यक्रम हा कौतुकास्पद आहे.” याप्रसंगी मोठ्या प्रमाणात स्थानिक आणि कार्यकर्ते जमले होते, ह्यावेळी चार हजार महिलांना सरंजाम वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ म्हणाले, ”विनोद धोत्रे सारख्या विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देणे महत्वाचे आहे. समाजउपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल नक्कीच नागरिकांना याचा उपयोग होतो.”

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना विनोद धोत्रे म्हणाले, ”सामाजिक चळवळीशी माझे कुटुंबातूनच नाते आहे. त्यामुळेच माझ्या कार्याचा केंद्रबिंदू हा सामान्य नागरिकच असणार आहे.”