Mahesh Tapase | कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपच्या निशान्यावर

Mahesh Tapase | मोदी परिवाराच्या एका मंत्र्याने आज तडकाफडकी राजीनामा देऊन सन्मान जनक वागणूक मिळत नसल्याची जाहीर टीका केंद्रातील मोदी सरकारवर केली तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राज ठाकरे (Raj Thackeray) युती करिता दिल्लीत दाखल झाले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली आहे.

महेश तपासे म्हणाले की, मोदी परिवार मधील मंत्री पशुपती पारस यांनी राजीनामा दिला आहे. मोदी परिवारामध्ये सन्मान मिळत नसल्याने राजीनामा देत आहे असे पारस म्हणाले.

केंद्रातील मंत्री आत्मसन्मानासाठी एकेकडे राजीनामा देतात तर महाराष्ट्रातील मनसे प्रमुख राज ठाकरे भाजपशी युतीच्या चर्चा करण्यासाठी दिल्लीत जातात एवढी लाचारी महाराष्ट्राने पाहिली नाही असा टोला महेश तपासे यांनी लगावला. कल्याण लोकसभा मतदारसंघांत युतीचे संबंध फार ताणले गेले आहेत व संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कडवे आव्हान दिले असून कल्याण लोकसभा मतदारसंघात कमळ निशाणी वर निवडणूक व्हावी असे पत्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

जो तो आपल्या कर्माने मरेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले असे त्यांच्याच पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी माध्यमांना कळविले. यावर बोलताना तपासे म्हणाले मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातल्या जिव्हाळ्याचे दर्शन आज महाराष्ट्राला घडले आणि महायुतीमध्ये एकमेकांसंदर्भात किती प्रेम व आपुलकी आहे हे दिसून आले असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

एकीकडे महाविकास आघाडी अदृश्य शक्तीला रोखण्यासाठी कार्यरत असताना महायुतीमध्ये जागा वाटपा वरून रस्सीखेच सुरू असतानाच महाराष्ट्रातील मनसे महायुतीत सामील झाल्यास महायुतीत महा तांडव होणार असेही महेश तपासे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका