भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक: पुण्यात गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : सायबर भामट्याने भाजपच्या राज्यातील ४ महिला आमदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोड नावाच्या तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती.

आमदारांनीही मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक: पुण्या भाजपच्या चार महि भाज भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक: पुण्यात गुन्हा दाखल पच्या चार महिला आमदारांची फसवणूक: पुण्यात गुन्हा दाखल ला आमदारांची फसवणूक: पुण्यात गुन्हा दाखल त गुन्हा दाखल