राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाच्या आमदाराची मागणी

MLA Disqualification Case Verdict : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांचा गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी काल दिला. शिवसेनेत 21 जून 2022 रोजी फूट पडली. त्या दिवसापासून सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांचं प्रतोद पद अवैध ठरतं, त्यामुळं त्यांनी जारी केलेला व्हिप किंवा त्यांनी आयोजित केलेली बैठक वैध ठरत नसल्याचं नार्वेकर यांनी काल दिलेल्या निकालात स्पष्ट केलं. तसंच नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली आहे.

21 जून 2022 रोजी रोजी एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं आणि नंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे न्यायालयानं एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची शपथ वैध ठरवली. प्रतिस्पर्धी गटानं दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी सभापतींनी शिवसेना पक्षाच्या मूळ घटनेवर अवलंबून राहणे आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानुसार नार्वेकर यांनी 1999 ची शिवसेना पक्षाची घटनाही वैध मानली आहे.

दरम्यान, या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh)उपरोधिकपणे प्रतिक्रिया दिली. राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश करा, यासाठी भाजपनं कायद्यात बदल करावा असा टोला आमदार नितीन देशमुखांनी लगावला आहे. तसेच गाढवाने गाढवासारखा दिलेला निकाल असं म्हणत त्यांनी राहुल नार्वेकरांवर (Rahul Narwkar) टीका केली आहे.

नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, देशमुखांची मागणी
आमदार अपात्रता प्रकरणी निकालाच्या आधीच आमदार नितीन देशमुखांनी त्यावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, निकाल आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितलं तसा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो कारण आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक