‘सेना तोंडावर आपटली… तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले’

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे (BJP) तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा (Dhananjay Mahadik) विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवानंतर  आता विरोधकांच्या निशाण्यावर शिवसेना आली आहे. सेना तोंडावर आपटली… तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले असं म्हणत मनसेने हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर ट्वीट करत  जोरदार टीका केलीआहे.

ते म्हणाले,  राष्ट्रवादी समोर लाचारी पत्करून आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणाऱ्या त्या  निजामाच्या औलादीची मदत घेवून ही सेना तोंडावर आपटली… तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले… विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला… असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.