प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ल्यांची होणार सुधारणा, शिवेंद्रराजेंची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ल्यांची होणार सुधारणा, शिवेंद्रराजेंची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

सातारा : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि शिवरायांच्या पराक्रमाची अखंड साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले प्रतापगड आणि अजिंक्यतारा किल्ल्यांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करा. या दोन्ही किल्ल्यांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू, असे आश्वासक प्रतिपादन शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

किल्ले प्रतापगड आणि अजिंक्यतारा किल्ल्यांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यासंदर्भाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लवकरच तज्ञ् सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही किल्ल्यांची प्राथमिक पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सातारा यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कोल्हापूर येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांनी या दोन्ही किल्ल्यांची नुकतीच पाहणी केली. किल्ल्यांच्या सुधारणा व सुशोभीकरणाच्यादृष्टीने शिवेंद्रराजे यांच्यासोबत नागेशकर यांनी चर्चा केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग साताराचे उप अभियंता राहुल अहिरे, महाबळेश्वरचे उप अभियंता महेश ओंजारी, कनिष्ठ अभियंता संजय तवले आदी उपस्थित होते.

प्रतापगड किल्ल्यावरील बुरुज, तटबंदी दुरुस्ती करणे, तलावांची स्वछता करणे आणि वास्तूंचे पुरातन ऐतिहासिक स्वरूप व सौन्दर्य कायम ठेवणे, अशा पद्धतीने सुशोभीकरण करणे तसेच भवानी माता मंदिरात काहीठिकाणी सिमेंट बांधकाम झाले आहे तेथे जुन्या पुरातन पद्धतीने बांधकाम करणे, नगारखाना, राजमार्ग दुरुस्ती या सर्व बाबींची सुधारणा शिवकालीन ठेवणीप्रमाणे झाली पाहिजे. यासाठी सुमारे २०० कोटी निधी अपेक्षित असून काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. याबाबत सविस्तर चर्चा झाली.

अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळाई देवी मंदिराची सुधारणा करणे. दक्षिण दरवाजा आणि किल्ल्यावरील वॉकिंग ट्रॅक यांची सुधारणा करणे. जुना राजवाडा आणि सदर, तलाव यांचेही बांधकाम, सुधारणा आदी बाबी पुरातन आणि ऐतिहासिक ठेवणीला धरून करण्याबाबत चर्चा झाली. या दोन्ही कामांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे तातडीने पाठवा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात बैठक घेण्यास सांगू आणि जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच मी वैयक्तिक माझ्या कुटुंबाकडूनही आर्थिक मदत करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=DBZ9rSr33XU

Previous Post
'अजिंक्यतारा' शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द, शिवेंद्रराजेंचा शब्द

‘अजिंक्यतारा’ शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द, शिवेंद्रराजेंचा शब्द

Next Post
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय

Related Posts
harnaz sandhu

परीक्षकांनी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स 2021

नवी दिल्ली- भारताच्या 21 वर्षीय हरनाझ संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकला आहे. यावर्षी 70 वी मिस…
Read More
उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांना 1996 सालीच मुख्यमंत्री व्हायचं होतं, माजी मंत्र्याने केला गौप्यस्फोट 

बीड – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत(Uddhav Thackeray) एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते तथा माजी…
Read More

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती

मुंबई –श्रीनगर (Shrinagar) येथे महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath…
Read More