‘गजानन किर्तीकर पण शिंदे गटात गेले …नवाब पिता,पुत्र व विश्वप्रवक्ते तिघेच राहणार अस दिसतंय शिल्लक सेनेत’

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले तसेच भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या.

ह्या कार्यक्रमात खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर , रामदास कदम आणि मोठे संख्येने बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते.

दरम्यान, किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मनसेचे नेते गजानन काळे यांनी खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, खासदार गजानन किर्तीकर पण शिंदे गटात गेले …नवाब पिता,पुत्र व विश्वप्रवक्ते तिघेच राहणार अस दिसतंय शिल्लक सेनेत … असं काल यांनी म्हणत ठाकरेंना डिवचले आहे.