Irfan Pathan | अखेर माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने दाखवला पत्नीचा चेहरा, सुंदरता पाहून चाहते घायाळ!

Irfan Pathan Wife Safa Baig : इरफान पठाणने 3 फेब्रुवारीला पत्नी सफा बेगसोबत लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला. यावेळी इरफानने पत्नी सफा बेगचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. इरफान पठाणने (Irfan Pathan) पहिल्यांदाच आपल्या जोडीदाराचा चेहरा लोकांसमोर उघड केला. या दाम्पत्याला इम्रान आणि सुलेमान अशी दोन मुले आहेत.

 

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या लग्नाचा आठवा वाढदिवस 3 फेब्रुवारीला होता. यावेळी पठाणने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली. इरफानने पहिल्यांदाच त्याची पत्नी सफा बेगचा चेहरा सोशल मीडियावर उघड केला. इरफान पठाणने सोशल मीडियावर खास संदेश लिहून पत्नीबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त केले.

पठाणने लिहिले, एकाच आत्म्याने अनंत भूमिका साकारल्या आहेत – मूड बूस्टर, कॉमेडियन, ट्रबल-शूटर आणि माझ्या मुलांचा सतत साथीदार, मित्र आणि आई. या सुंदर प्रवासात मी तुला माझी पत्नी म्हणून जपतो. आपल्या आठव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे
टीम इंडियाच्या चमकदार कारकिर्दीनंतर इरफान पठाण क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयात पठाणने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा