Eknath Shinde | मोदींचा जन्म राजनितीसाठी नाही राष्ट्रनितीसाठी झालाय, मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Eknath Shinde | आकाशात सूर्य आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे तेजस्वी नेतृत्व उजळून निघाले आहे. मोदींनी केवळ राम मंदिर बनवले नाही तर या देशात रामराज्य आणले. इंडि आघाडी जनतेला विचारत आहे, आमच्याकडे राहुल आहे, सोनिया आहे, उबाठा आहे, स्टॅलिन आहे, केजरीवाल आहे, तुमच्याकडे काय आहे? त्यावर या देशातील जनतेचे एकच उत्तर आहे ते म्हणजे आमच्याकडे मोदी गॅरंटी आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर केला. विश्वासाचे दुसरे नाव मोदी गॅरंटी आहे, असे ते म्हणाले.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासाठी आज शनिवार ता. २० एप्रिल २०२४ रोजी नांदेड येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’, अशी काँग्रेस आणि विरोधकांची अवस्था झाल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की काँग्रेसची हालत इतकी खराब आहे की, ते आपसांत लढत आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी आपल्याला ताकद लावण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. मोदींचा जन्म राजनितीसाठी तर राष्ट्रनितीसाठी झाला आहे. प्राण गेला तरी वचन मोडणार नाही, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

गांधी परिवाराला आपल्या पारंपारिक अमेठी मतदारसंघातून जिंकण्याची गॅरंटी नाही. त्यामुळे ते इकडे तिकडे पळत आहेत. ज्यांना आपल्या विजयाची गॅरंटी नाही. ते देशाची काय गॅरंटी देणार असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे काँग्रेसचे स्वप्न आहे. पण जनता स्वप्नातही राहुल गांधींना पंतप्रधान करणार नाही. जगात भारताची बदनामी करणारे राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाही. पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच ही जागांवर १०० टक्के महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ओबीसी आणि इतर कोणत्याही समाज्याच्या आरक्षणाला धक्का न लावता महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र काही लोक मराठा आरक्षणाबाबत समाजाला भडकावत आहेत. शरद पवार आणि महाविकास आघाडीने आरक्षण दिले नाही. आम्ही आरक्षण दिल्यानंतर ते टिकणार नसल्याची टीका करत आहेत. उच्च न्यायालयात आरक्षण टिकले असून सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा