गंगाखेड : अभाविपच्या आंदोलनाला आले यश; विद्यार्थ्यांची प्रवासासाठी होत असलेल्या नाहक त्रासातून झाली सुटका

गंगाखेड – अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (ABVP) शैक्षणिक क्षेत्रातील विविध विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असते. खेड्यापाड्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी गंगाखेड (Gangakhed) शहरात येतात. त्यांना त्यासाठी बसने प्रवास करावा लागतो. पण काही कारणास्तव बसची योग्य ती सोय होत नाहीये यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवासासाठी होत असलेल्या नाहक त्रासा बाबत आज अखिल भारतीय विद्यार्थी परीषदे कडून निवेदन देण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्या करण्यात आल्या. 1. विद्यार्थ्यांसाठी गंगाखेड ते पिंपळदरी स्पेशल बस चालू करणे.2. गंगाखेड ते दामपुरी मार्गे अहमदपुर बंद केलेली बस चालू करणे3. गंगाखेड ते पिंपळदरी मार्गे किनगाव बस वेळेवर सोडणे.हे विषय मांडण्यात आले.

विद्यार्थ्यांना बसच्या गैरसोयीमुळे शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. अशा तीन मागण्या घेऊन आगार प्रमुखाकडे निवेदन देण्यात आले. याची दखल घेत गंगाखेड ते पिंपळदरी मार्गे किनगाव बस वेळेवर सोडण्यात आली. अशा प्रकारे अभाविपचा आंदोलनाला यश मिळाले.यावेळी अभाविप जिल्हा संयोजक अजय टोले (Ajay Tole), तालुका संयोजक राजेश्वर फडणविस, शहरमंत्री वैष्णवी अनावडे,सहमंञी अर्जुन चव्हाण, प्रतिक्षा मुसळे,श्रृत्ती कळपे,सुमंत गोरवे,संदीप पवार,श्रावण पांचाल,कृष्णा फड यांच्या सह आदी कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.