Kolhapur News | महायुतीच्या उमेदवारांचा लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आज रणरागिणी ताराराणींच्या कोल्हापुरात २० हजारांपेक्षा अधिक महिला शक्तिचा सागरच उसळला. कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले.
‘आई अंबाबाईच्या पवित्र भूमीत महिला शक्तिच्या रुपाने शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेला हा आशीर्वादच आहे. रणरागिणी ताराराणींच्या कर्तव्यभुमितील हा महिला – भगिनींचा प्रतिसाद शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांसह महायुतीच्या उमेदवारांचा आत्मविश्वास उंचावणारा आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांनी आई अंबाबाईच्या चरणी वंदन अर्पण करून, रणरागिणी ताराराणींनाही अभिवादन करत असल्याचे म्हटले आहे.
प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरण्यात आले. यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत महिला प्रचंड संख्येने सहभागी झाल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आणि शहरांतील महिला भगिनींनीच या दोन्ही उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन केल्याची दिसून आले. धनुष्यबाण चिन्हांच्या टोप्या, शिवसेनेचे उपरणे आणि भगवे बॅनर घेऊन महिला सहभागी झाल्या. यामुळे कोल्हापूर शहर भगवामय झाले. उन्हाच्या तलखीतही महिला- भगिनींनी प्रचंड उत्साहाने सहभागी झाल्याने उमेदवार प्रा. मंडलिक भारावून गेले. महिला- भगिनींच्या प्रचंड संख्येनेच आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याची भावना व्यक्त करून प्रा. मंडलिक यांनी आपण या स्त्रीशक्ती पुढे विनम्र झालो आहे. त्यांच्यापुढे नतमस्तक झालो आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर या महिला – भगिनीं तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने आपापल्या परिसराकडे रवाना झाल्या. पण त्यांच्या अभूतपूर्व सहभागाने कोल्हापूरकरांनी (Kolhapur News) महिला शक्तिचे अनोखे रूप अनुभवले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :