ड्रगमाफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा दोघींवर आरोप

Lalit Patil – दोन आठवड्यांपूर्वी ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बंगळुरु इथून अटक केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक इथल्या अमली पदार्थ तस्करी (Drug trafficking) प्रकरणात आरोपी असलेल्या ललितला मुंबईतल्या एका व्यक्तिकडून कच्चा माल मिळत होता, त्यालाही अटक करण्यात आली आहे.

ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून (Nashik News) अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रगमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या दोन मैत्रीणींना अटक केली आहे. या दोघींनी पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम (Pragya Kamble and Archana Nikam) अशी दोघींची नावं आहेत.

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचं समोर आलंय. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता तसंच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

https://www.youtube.com/shorts/f5bvipYhCnk

महत्वाच्या बातम्या-

‘हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत’

‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र

2024 साली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार