मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर गुन्हेगार पाळून ठेवले आहेत; भाजप आमदाराचा आरोप 

Ganpat Gaikwad : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) भाजप आमदार (BJP)  गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच  गोळीबार  झाला. त्यानंकर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यात वाद झाला. यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले आहेत त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की, ‘पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली. या लोकांनी माझ्या जागेवर कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला या कृत्याचा पश्चाताप नाही.’ पुढे बोलताना आमदार गणपत गायकवाड म्हणाले की, माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे मी गोळीबार केला. त्यांना जीवे मारण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र पोलिसांसमोर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला गोळीबार करणं गरजेचं होतं.

या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना म्हटले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी असे गुन्हेगार राज्यभर पाळून ठेवले आहेत. शिंदे मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. तसेच माझ्यावर अन्याय होत असल्याची कल्पना वरिष्ठांना दिली होती असंही गायकवाड यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

Lalakrishna Advani | लालाकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

सर्वसामान्यांना लुटायचे आणि श्रीमंतांना वाटायचे हेच मोदी सरकारचे धोरण, नाना पटोलेंची टीका

Nana Patole | मागासवर्गीय असल्यानेच छगन भुजबळांबद्दल खालच्या पातळीवरची भाषा

अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू, Cervical Cancer मुळे वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी सोडले जग