BJP | भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याण : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) भाजप आमदार (BJP)  गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच  गोळीबार  झाला. त्यानंकर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे (BJP) कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यात वाद झाला. यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड, शहरप्रमुख यांच्यात वाद झाला.यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Lalakrishna Advani | लालाकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

सर्वसामान्यांना लुटायचे आणि श्रीमंतांना वाटायचे हेच मोदी सरकारचे धोरण, नाना पटोलेंची टीका

Nana Patole | मागासवर्गीय असल्यानेच छगन भुजबळांबद्दल खालच्या पातळीवरची भाषा