Sanjay Raut | गृहमंत्र्यांना आजच्या प्रकारानंतर उत्तर द्यायला तोंड उरलं आहे का? राऊत फडणवीसांवर बरसले  

Sanjay Raut : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) भाजप आमदार (BJP)  गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच  गोळीबार  झाला. त्यानंकर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यात वाद झाला. यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले आहेत त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपेक्षेप्रमाणे सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात, आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? शिवसेना, खरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबाबतच कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हा नियम आहे का?असा सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर विनाचौकशी त्याला फासावर लटकवलं असतं. तुमच्या जिल्ह्या माफियांचं राज्य चाललं आहे. नागपूर, ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांमध्ये राजकीय स्वार्थासाठी आणि निवडणूक जिंकण्याठी गुन्हेगार आणि माफियांना संरक्षण दिलं जातं आहे. महाराष्ट्रातलं हे चित्र अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना आजच्या प्रकारानंतर उत्तर द्यायला तोंड उरलं आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे