‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Naseem Shah Emotional: आशिया चषकातील (Asia Cup 2023) हाराकिरीनंतर पाकिस्तान संघाने आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ साठी (ICC ODI World Cup 2023) १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इंजमाम उल हक यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे. मात्र पाकिस्तान संघाला मोठा फटका बसला असून त्यांचा स्टार बॉलर बाहेर पडला आहे.

बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर शादाब खान उपकर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच स्टार बॉलर नसीम शाह दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे. नसीम याच्या जागी हसन अली याला संधी देण्यात आली आहे. नसीम शाहला (Naseem Shah Injury) शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो पुढील तीन-चार महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहणार आहे, असे पीसीबीच्या वैद्यकीय पथकाने म्हटले आहे. यादरम्यान वर्ल्डकप संघातून वगळल्यानंतर नसीम शाहची सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे.

‘मी खुप जड अंतःकरणाने सांगत आहे की, मी माझ्या प्रिय देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या अद्भुत संघाचा भाग नसणार आहे. मी खूप निराश आहे पण मला विश्वास आहे की सर्व काही अल्लाहच्या हातात आहे, इंशाअल्लाह मी लवकरच मैदानात परतेन. माझ्या सर्व चाहत्यांनी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार,’ अशी पोस्ट नसीम शाहने केली आहे.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, सौद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली , उसामा मीर, आणि मोहम्मद वसीम जूनियर.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती