मविआचे मंत्रीच माथी भडकाविणार असतील तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची!

मुंबई – त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर लोकांची माथी भडकाविणारी, चिथावणी देणारी विधाने भर मंचावरून करीत असतील, तर या दंगलीची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे सांगत सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे हे दुर्दैवी आहे. त्रिपुरा सरकार आणि तेथील पोलिसांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. जी मशिद जाळली गेली, असा आरोप केला आहे, तशी मशिद जाळण्याची कोणतीही घटना झालेलीच नाही. त्या मशिदीचे फोटो सुद्धा जारी करण्यात आले. त्यामुळे केवळ खोटा प्रचार केला गेला.

ज्यांनी खोटा प्रचार केला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. पण, निव्वळ अफवेवर मोर्चे काढण्यात आले. जाळपोळ करण्यात आली आणि हिंदूंची दुकाने जाळली गेली. अमरावतीतील घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. हा एका सुनियोजित षडयंत्राचा भाग वाटतो. अशात राज्य सरकारमधील मंत्रीच जर भावना भडकावित असतील, तर हे अधिकच गंभीर आहे. अशात वातावरण चिघळल्यास दंगलींची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर असेल. सर्वांनी शांतता पाळावी, हे माझे सर्वांना आवाहन आहे असं फडणवीस म्हणाले.

https://youtu.be/iLGbybjU9tc

Previous Post

कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नसिम खान

Next Post

पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे होणार बालदिन साजरा

Related Posts
दोन आरोपींच्या अकटेनंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया, म्हणाले, ते लवकरच...

दोन आरोपींच्या अकटेनंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया, म्हणाले, ते लवकरच…

Dhananjay Deshmukh | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. वाल्मिक कराडने सीआयडीसमोर शरणागती…
Read More
Nana Patole | नरेंद्र मोदींच्या वैचारिक पूर्वजांचेच 'मुस्लिम लीग' वर जुने प्रेम व सत्तेसाठी राजकीय आघाडी

Nana Patole | नरेंद्र मोदींच्या वैचारिक पूर्वजांचेच ‘मुस्लिम लीग’ वर जुने प्रेम व सत्तेसाठी राजकीय आघाडी

Nana Patole –  काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा…
Read More
मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच असेल आणि विजय देखील माझाच - श्रीरंग बारणे 

मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच असेल आणि विजय देखील माझाच – श्रीरंग बारणे 

Srirang Barane : आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून महायुतीकडून माझ्या उमेदवारी बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More