Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’

Sharad Ponkshe On Bajirao Peshwa: आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी श्री गणपती पंचायतन संस्थानतर्फे दरबार हॉलमध्ये आयोजित श्री गणपती उत्सवातंर्गत दुसरे पुष्प ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ या विषयावर गुंफले. बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता. धर्मकारण, राजकारण, युध्दनीती यासह त्यांचा व्यासंग सर्वव्यापी होता. दुर्दैवाने जाती-पातीचे राजकारण व व्यक्तिद्वेषामुळे त्याचा पराक्रम समोर येऊ दिला नाही, असं स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी व्यक्त केलं.

इतिहासात बाजीराव पेशवे (Bajirao Peshwa) यांची ओळख केवळ मस्तानीशी नाते जोडून केली गेली. महापुरुषांचा खरा इतिहास समाजासमोर येण्यासाठी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन त्याचे कर्तृत्व नव्या पिढीने जाणून घ्यावे, असे प्रतिपादनही ज्येष्ठ अभिनेते पोंक्षे यांनी केले.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती