शिंदेंच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम; नृत्यांगणा म्हणते, ‘ठाणेकरांकडून मला नेहमीच प्रेम…’

Gautami Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दिवाळी पहाटच्या (Diwali Pahat) कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर गौतमीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेकरांचं प्रेम कसं वाटलं? असा प्रश्न विचारला असता गौतमी पाटीलने (Gautami Patil) खास उत्तर दिलं आहे. तिने स्मितहास्य करत “एक नंबर” असं उत्तर दिलं आहे.

ठाण्यातील कार्यक्रमाबद्दल विचारलं असता गौतमी पाटील पुढे म्हणाली, “मला खूप छान वाटलं, मी नेहमी म्हणत असते की, मुंबईचे प्रेक्षक मला खूप आवडतात. मला नेहमी त्यांचं प्रेम मिळतं. सगळेजण पाच-सहा वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी येऊन थांबले होते. त्यामुळे खूप छान वाटलं. तुम्हाला आणि सर्व प्रेक्षक वर्गाला, महिला वर्गाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.”

महत्वाच्या बातम्या-

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत

डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी या योगासनांचा सराव करा, आयुष्यभर लागणार नाही चष्मा!

Beetroot Carrot Juice: गाजर आणि बीटरूटचा रस हिवाळ्यात आहे खूप फायदेशीर, जाणून घ्या त्याचे काही आश्चर्यकारक फायदे