आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…; एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा दावा

मुंबई – निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena-Uddhav Balasaheb Thackeray), असं नाव, तसंच मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना(Shiv Sena of Balasaheb) हे नाव मिळालं आहे. मात्र, निवडणूक चिन्हासाठी त्यांनी दिलेले तिन्ही पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळले असून, त्यांना नव्यानं तीन पर्याय द्यायला सांगितलं आहे.

दरम्यान, नवं नाव मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. असं त्यांनी ट्वीट केलं असून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचा फोटोही त्याला जोडला आहे.