लाखात एक पोर! ‘मी नवऱ्याला सोडेन, पण आईला सोडणार नाही’; गौतमी पाटीलचं मन जिंकणार वक्तव्य

Gautami Patil – गौतमी पाटील.. महाराष्ट्रात या नावाची सध्या सर्वाधिक चर्चा होतेय. गौतमी पाटीलच्या नृत्यावर नाक मुडरणाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही तिच्या कार्यक्रमांना अलोट गर्दी असते. अगदी लोक झाडांवर, भींतीवर, मिळेल तिथून गौतमीचा नाच पाहण्यासाठी वेडे झालेले दिसतात. गौतमी तिच्या नृत्यामुळे तर चर्चेत असतेच, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याचीही अनेकांना उत्सुकता आहे. नुकतेच गौतमीने तिच्या आईवरील प्रेम व्यक्त केले आहे.

गौतमीच्या वडिलांनी ती लहान असताना गौतमीचे वडील त्यांना सोडून गेल्यानंतर आईनेच तिला सांभाळलं. आई- बापाची माया देत तिला लहानाचं मोठं केलं. अशा काळात पैशांची चणचण वाढली आणि परिस्थितीमुळे गौतमीला शाळा सोडावी लागली. आईला थोडी मदत व्हावी म्हणून तिने डान्स करायला सुरुवात केली. या काळात तिची आई आजारी पडली. आता आईची काळजी घेण्यासाठीच ती डान्स करत असल्याचं गौतमीने सांगितलं.

गौतमीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यात तिची आईसाठी असणारी काळजी आणि तळमळ स्पष्ट दिसते. ती म्हणाली की, ‘मी आईसाठीच सारं काही करतेय. एक विचार नेहमी मनात असतो की जर माझं लग्न झालं तर तिचं काय होईल?, ती कुठे जाणार?, तिला कोण सांभाळणार? हे जरी असलं तरी तिला एकटं सोडून मी कधी जाणार नाही. एखादवेळेस मी नवऱ्याला सोडेन पण आईला सोडणार नाही.’