शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कलाकृती दीर्घकाळ टिकून राहतील

Babasaheb Purandare: जाणता राजा या कलाकृतीसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या ज्या कलाकृती निर्माण केल्या, त्या एवढ्या भव्य आहेत की, या कलाकृती दीर्घकाळ टिकून राहतील, असे मनोगत पं. अजय पराड यांनी व्यक्त केले.

अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी आयोजित केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत पं. पराड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे व्यवस्था प्रमुख गुरुनाथ शिरोडकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जे काही करायचे ते भव्य करायचे म्हणजे ते दिव्य होते. जे भव्य ते दिव्य असते, हा बाबासाहेबांचा विचार होता आणि त्यावर त्यांचा विश्वासही होता, असे पं. पराड यांनी सांगितले. समाजाला योग्य दिशा आणि योग्य विचार देण्याचे काम व्याख्यानमाला करतात, असे शिरोडकर म्हणाले.

समूह नाट्याचे प्रणेते संजय पुरंदरे, जाणता राजा महानाट्याचे प्रथम दिग्दर्शक दिवाकर पांडे, होनराज मावळे आणि सहकलाकारांनी यावेळी कला रसिक बाबासाहेब हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि गायन, वादन, निवेदनाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त मंदार सहस्रबुद्धे यांनी, संयोजन राजाभाऊ पानगावे, शिरीष किराड यांनी आणि सूत्रसंचालन नागेश पाटील यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki