सुरक्षिततेच्या अभावामुळे आणि नागरी हक्क नाकारल्यामुळे ‘या’ देशातील हिंदु सोडत आहेत देश

Dhaka – बांग्लादेशात सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर, बांग्लादेश सरकारवर विरोधी पक्षाने हल्ला चढवला आहे. सुरक्षिततेच्या अभावामुळे आणि नागरी हक्क नाकारल्यामुळे देशातला सर्वात मोठा अल्पसंख्याक हिंदु समुदाय देश सोडून जात असल्याचा आरोप, बांग्लादेश नॅशनलिस्ट पक्षाने सरकारवर केला आहे.

हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन कल्याण फ्रंटच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमामध्ये बांग्लादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या स्थायी समिती सदस्य गायेश्वर रॉय यांनी सरकारवर आरोप केले. सध्या रोजच हिंदू लोक देश सोडून जाताहेत, 1960 च्या दशकात देशात 37 टक्के हिंदू लोकसंख्या होती मात्र ती आता 10 टक्क्यांहून कमी झाली आहे. न्यायालन आणि प्रशासनासह सर्वत्र हिंदुची उपेक्षा केली जात असल्याचे रॉय म्हणाले.