हार्दिक बनला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार, आता रोहितचं काय होणार? तो कोणत्या टीमकडून खेळणार?

Mumbai Indians New Captain: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा लिलाव काही दिवसात होणार आहे आणि त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवले आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासून ही अपेक्षा व्यक्त केली जात होती.

याची अधिकृत घोषणाही मुंबई इंडियन्सने केली आहे. आयपीएल 2024 मध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले असून ट्रांझिशन फेज सुरू झाली आहे, असे विधान संघाकडून करण्यात आले आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माची जागा घेणार आहे.

 

मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स महेला जयवर्धने म्हणाले की, कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या चमकदार कारकिर्दीबद्दल आम्ही आभारी आहोत आणि ही एक प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत आता हार्दिकला कर्णधार बनवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सकडे सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकीपासून रोहितपर्यंत अनेक संघ नेते झाले. आता हार्दिक पांड्याची पाळी आहे.

रोहित शर्मा 2013 पासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत होता आणि गेल्या 10 वर्षात तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जात होता. पण एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील पराभवानंतर रोहित यावेळी आयपीएलमध्ये मोठा निर्णय घेईल अशी शंका व्यक्त केली जात होती.

महत्वाच्या बातम्या-