ज्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करतो, त्याप्रमाणे २०२४ मध्ये पवारांचं विसर्जन करायचं आहे – पडळकर 

बारामती – आपण सर्वजण ज्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करतो, त्याप्रमाणे २०२४ मध्ये पवारांच विसर्जन करायचं आहे त्यासाठी आपण आज बारामतीत आलो असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलं आहे. बारामतीत आज भाजपाची संघटनात्मक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीदरम्यान पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,  पाकिस्तानची मॅच जिंकल्यावर हात वरून शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. आज त्यांना आरती करताना व्हिडिओ टाकावे लागत आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे यश आहे. 2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बारामतीत आले आहेत. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांना (Sharad Pawar) पळून जावं लागणार असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एका मेळाव्यात  केला.

गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, एखाद्याला फसवून घ्यायचं लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचे (MVA) सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे (Supriya Sule) या वरमाई सारख्या फिरत होत्या. निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणार देखील नसल्याचे पडळकर यांनी म्हटले.