शिवसेनेची राखरांगोळी केल्यानंतरही हा माणूस शांत बसण्यास तयार नाही – पडळकर 

 सांगली – २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना ( ठाकरे गट ) संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.ते  म्हणाले, संजय राऊत वेडे झाले आहेत. पवारांच्या हातात हात घालून शिवसेनेची राखरांगोळी केल्यानंतरही हा माणूस शांत बसण्यास तयार नाही. रोज वेगवेगळी विधान करणं, विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं, निवडणूक आयोगाला अर्वाच्च भाषेत बोलणं सुरु आहे.अशी टीका त्यांनी केली आहे.