ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, घातक फिरकीपटूचे दीड वर्षांनंतर पुनरागमन

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात (Indian Squad) आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेगळ्या संघाची निवड केली आहे, तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेल्या संघात केवळ विश्वचषक संघात असलेल्या खेळाडूंनाच संधी देण्यात आली आहे. मात्र, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) तीनही एकदिवसीय सामन्यांसाठी संघाचा भाग आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर तो वनडे संघात परतला आहे. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. जून 2017 मध्ये भारतीय एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर अश्विनने गेल्या सहा वर्षांत केवळ दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. अक्षर पटेल तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात आहे, पण त्याच्या फिटनेसवर संशय आहे. जर तो तंदुरुस्त नसेल तर अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदरला विश्वचषक संघात संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी)
केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविंद्रन, रविंद्रन. , वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या सामन्यासाठी
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव., अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

https://youtu.be/TX3th3G8Jxw?si=h95znRKD99Z0jYXs

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल