ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करून त्यांना खंजीर चिन्ह द्यायला हवं होतं – पडळकर

बारामती : राष्ट्रवादीसोबत जाणारे संपतात, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या (Shivsena) बाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं,’ असा खोचक टोला भाजपचे (BJP) विधानपरिषद आमदार गोपिचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी लगावला आहे. निवडणूक आयोग (Election Commission) कोणताही दुजाभाव करत नाही. उलट शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र करून आयोगाने खंजीर हे चिन्ह द्यायला हवे होते, अशी खोचक टीकाही पडळकर यांनी केली आहे.

पडळकर पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला वेळ लागेल. त्याऐवजी शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) या दोन पक्षांनी एकत्र येत खंजीर चिन्ह घ्यायला हवे होते. राष्ट्रवादीचा जन्मच खंजीरातून झाला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून या दोघांना खंजीर चिन्ह द्यायला हवे होते, असं पडळकर म्हणाले.