टरबुजाने बंडखोर आमदारांवर ७ हजार कोटी खर्च केले आणि दाढीवाला…; चंद्रकांत खैरेंची जहरी टीका

औरंगाबाद –  शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात  आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर  शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना गंभीर आरोप केले आहेत.

गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना ७,००० कोटी रुपये देण्यात आले, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. तसेच हा खर्च टरबुजाने केला की कुणी केला? असा सवाल उपस्थित शिवसैनिकांना केला. यावर शिवसैनिकांनी टरबुजाने केला असं उत्तर दिलं. यावर खैरेंनी टरबुजाने खर्च केला असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) लोक तुम्हाला याबाबत सांगतील, असं म्हटलं.

बंडखोर आमदारांना ७,००० कोटी रुपये दिले. तुमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मित्र असतील तर त्यांना विचारा. ते तुम्हाला सांगतील की यासाठी ७,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. संघ परिवार देखील काही असेल तर आमच्याकडून देणगी घेतं आणि हे पैसे तुम्ही तिकडे वापरता का?” असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला.

दरम्यान, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले आहे. त्यामुळे  सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातील विश्वासदर्शक ठराव या एकमेव उद्देशासाठी हे अधिवेशन बोलावण्यात यावे असं राज्यापालांनी पाठवलेल्या पत्रात म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.