मध्यरात्री फोन वाजला आणि गोविंदाने हा सुपरहिट चित्रपट सोडला, ‘या’ अभिनेत्याचे आयुष्य एका क्षणातच बदलून गेले

Govinda Walked Out Of Judwaa For Salman Khan: गोविंदाने अनेक वर्षे बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. एक काळ असा होता की त्यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट असायचा. गोविंदा यशाची हमी बनला होता आणि बॉक्स ऑफिसवर स्वत:च्या जोरावर चित्रपट काढायचा.

सलमान खानचा ‘जुडवा’ हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गोविंदा याआधी या चित्रपटात काम करत होता. चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते, मात्र सलमान खानच्या विनंतीवरून त्याने चित्रपट सोडला. त्यावेळी सलमान खानच्या करिअरमध्ये काही विशेष घडत नव्हते. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

गोविंदाने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ही रंजक गोष्ट उघड केली होती. तो म्हणाला, ‘मी माझ्या करिअरच्या शिखरावर होतो. बनारसी बाबू या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि मी जुडवामध्येही काम करत होतो. जुडवाचे शूटिंग चालू असताना एके दिवशी रात्री २-३ च्या सुमारास सलमान खानने मला कॉल केला आणि म्हणाला- चिची भैया, किती हिट्स देणार? मी विचारले का काय झाले? तो म्हणाला, तुम्ही ज्या चित्रपटाचे शूटिंग करत आहात तो सोडून द्या आणि मला द्या. मला तुमचा डायरेक्टर पण द्या.

गोविंदाने सलमान खानला होकार दिला आणि लगेचच शूटिंग थांबवले आणि त्यानंतर ‘जुडवा’ हा चित्रपट सलमान खानला दिला. यामध्ये करिश्मा कपूर सलमान खानसोबत दिसली होती. सलमानच्या सांगण्यावरून या चित्रपटासाठी करिश्मा कपूरला कास्ट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. रिलीजनंतर ‘जुडवा’ने बॉक्स ऑफिसच्या बजेटपेक्षा चौपट कमाई केली. निर्मात्यांनी ते तयार करण्यासाठी केवळ 6.25 कोटी रुपये खर्च केले होते आणि बॉक्स ऑफिसवर 24.28 कोटी रुपयांची मोठी कमाई केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…