Govt scheme : घरकुल जागा खरेदीसाठी 50000 हजार मोफत; असा घ्या लाभ

पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

योजनेचे स्वरुप(Format of the plan)
ही योजना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकूल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.

योजनेच्या अटी(Terms of the scheme)
◆जिल्हाधिकारी वा शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय/संपादित जागा किंवा ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी व गावठाण हद्दीबाहेरील निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या जागा उपलब्ध करून देण्यात येतील.
◆निवडलेल्या जागेस लाभार्थ्यांची सहमत असावी.
◆घरकूल बांधकामासाठी ५०० चौ. फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता असेल.
◆जागेची किंमत प्रती लाभार्थी ५० हजार पेक्षा जास्त असल्यास त्यावरील रक्कम लाभार्थ्यांने भरणे बंधनकारक आहे.
◆लाभार्थ्यांने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा समिती करेल.
◆लाभार्थी जागा मालकाबरोबर विक्री करार करेल.
◆जागेसाठी देय निधी लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा करण्यापूर्वी लाभार्थ्यांने प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. त्यानंतरच देय निधी खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
◆जागेची नोंद लाभधारकाच्या पत्नीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येईल.

योजनेअंतर्गत लाभ(Benefits under the scheme)

◆लाभार्थ्यास ५० हजार रुपयेच्या मर्यादेत म्हणजेच जागेची प्रत्यक्ष किंमत व रुपये ५० हजार यापेक्षा जे कमी असेल त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. यामध्ये स्टॅम्प डयूटी व जागा हस्तांतरणासाठी नियमाप्रमाणे येणारा खर्च समाविष्ट असेल.

अधिक माहितीसाठी- पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.