Govt scheme :’या’ सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळतोय 30 हजार रुपये निर्वाह भत्ता योजना 

डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना

योजनेचे स्वरूप (Nature of the scheme)

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय तसेच अशासकीय अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषि विद्यापीठे व त्या विद्यापीठाअंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे तसेच स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजना बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्यांना लागू आहे.

लाभाचे स्वरूप (Nature of benefit)

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी-

■बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांला २ हजार रूपये निर्वाह भत्ता देण्याची तरतूद आहे.

■नवीन मंजूरीसाठी तसेच नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ-www.mahadbtmahait.gov.in