Govt scheme : शेतमाल तारण कर्ज योजना नेमकी काय आहे ?

शेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ राज्यातील बाजार समित्यांचे माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

योजनेचे स्वरूप(Nature of the scheme)

■ काढणी हंगामात शेतकऱ्यांस असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन या गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.

■ योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा (चना), भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका, बेदाणा, काजू बी, हळद, सुपारी व वाघ्या घेवडा (राजमा) या शेतमालाचा समावेश आहे.

■शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के पर्यंत ६ टक्के व्याज दराने ६ महिने कालावधीसाठी कर्ज त्वरीत उपलब्ध.

■बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांचे शेतमालासाठी गोदाम भाडे, विमा, देखरेख खर्च आदी खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड नाही.

■सहा महिन्याचे आत कर्ज परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना ३ टक्के व्याज सवलत.

■स्वनिधीतून तारण कर्ज राबविणाऱ्या बाजार समित्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रक्कमेवर ३ टक्के व्याज सवलत तसेच अनुदान स्वरूपात

■योजना राबविण्यासाठी स्वनिधी नसलेल्या बाजार समित्यांना पणन मंडळाकडून ५ लाख अग्रिम उपलब्ध.

■केंद्रीय, राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील शेतकऱ्यांच्या मालाच्या वखार पावतीवर तारण कर्ज उपलब्ध.

संपर्क- नजीकची कृषि उत्पन्न बाजार समिती तसेच कृषि पणन मंडळाची विभागीय कार्यालये.