सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातलाच का नेले जात आहेत? रोहित पाटलांचा सवाल

Mumbai – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. यावरून राज्यात आरोप-प्रत्योरापाच्या फैरी झडत आहेत.वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.

दरम्यान, यातच आता सगळे प्रकल्प (project) महाराष्ट्रातून एकाच राज्यात का नेले जात आहेत? इतर राज्य असताना फक्त गुजरातलाच प्रकल्प का नेले जात आहेत? हा प्रश्न असल्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटलांनी टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्याने हल्लाबोल केला.

रोहित पाटील सांगलीच्या अंजनीमध्ये बोलत होते. देशात महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर असताना महाराष्ट्रातील प्रकल्प एकामागून एक गुजरातमध्ये जात आहेत, देशात अनेक राज्य असताना फक्त गुजरात मध्येच हे प्रकल्प का जात आहेत? हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नसून तरुणांनी याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.