Govt scheme: महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना नेमकी काय आहे ?

योजनेचा उद्देश-

■ योजना (scheme) राज्यातील महिला बचतगटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांकरीता लागू आहे. इतर मागास वर्गातील गरीब, होतकरू, परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वावलंबी (self reliant) व आत्मनिर्भर (independant) करणे हा उद्देश आहे. महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन (product), प्रक्रिया (process), मूल्य (value) आधारित उद्योगांकरीता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या ५ ते १०लक्षपर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

■पात्र महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना सदर व्याज परतावा योजनेचा लाभ ओबीसी महामंडळाकडून घेता येईल. तसेच सदर बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून तसेच इतर शासकीय विभागाच्या तसेच महामंडळाच्या योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

■ इतर मागास प्रवर्गातील किमान ५० टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्प्यात ५ लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडुन उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात येईल.

■ प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात १० लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडुन मंजुर करुन घेण्यास पात्र होईल.

■अर्जदार महिलेने कोणत्याही वित्तीय संस्थेचा अथवा शासनाच्या योजनेचा किंवा महामंडळामार्फत राबवीत येत असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असल्यास पुर्वीच्या कर्ज रक्कमेची संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र]स्वयं घोषणा तसेच प्रतिज्ञापत्र लाभार्थीने सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:महिला आर्थिक विकास महामंडळ, ४७, अशोक बलकवडे मार्ग, नवी पेठ, सदाशिव पेठ, पुणे