आजपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा; राहुल गांधी करणार 3500 किमीचा पायी प्रवास

नवी दिल्ली – भारतातील प्रत्येक नागरिकाला जोडण्यासाठी काँग्रेस पक्ष बुधवारपासून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू करणार आहे. जगात प्रेम आणि बंधुता पसरवणे हा या प्रवासाचा उद्देश असल्याचं काँग्रेस (Congress) पक्षाने सांगितलं आहे हा प्रवास एकतेची ताकद दाखवण्यासाठी, एकसोबत चालत भारत घडवण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पक्षाने सांगितलं आहे की, राहुल गांधी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करणार आहेत. भारत जोडो यात्रेत दररोज 25 किमीचा पायी प्रवास असेल आणि 3500 किमीचा प्रवास 150 दिवसांत पूर्ण केला जाईल. यादरम्यान अनेक ठिकाणी चौकसभा आणि सर्वसाधारण सभांचे आयोजनही केले जाणार आहे. देशाला जोडण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. जेव्हा ही यात्रा निघेल तेव्हा इतिहास लिहिला जाईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.