“आझादी गौरव पदयात्रेला” गंगाखेडकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

गंगाखेड / विनायक आंधळे देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने आज देशभर ‘आझादी गौरव यात्रे’ (Azadi Gaurav Yatra) ची सुरुवात करण्यात आली. गंगाखेड (Gangakhed) येथे पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी गौरव पदयात्रा तिरंगा रॅली परभणी ग्रामीण जिल्ह्यात गंगाखेड ग्रामीण भागा पासून सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेत परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर (MLA Suresh Varpudkar), जेष्ठ नेते बाळकाका चौधरी, परभणी ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष प्रा.अभय कुंडगीर, उपाध्यक्ष नागेश डमरे, गंगाखेड ग्रामीण तालुका अध्यक्ष गोविंद यादव, शहरअध्यक्ष शेख़ यूनुस, विधानसभा युवक अध्यक्ष किशन काळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.