“जोर जबरदस्तीने आरक्षण मिळवता येत नाही, मराठा समाजाने मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये”

Gunaratna Sadavarte: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जोर जबरदस्तीने आरक्षण मिळवता येत नाही. मराठा समाजाने मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये, असे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

“मराठा समाजातील बांधवांनी मोठं मोठ्या पदावर जावं पण मागासवर्गीय होऊन जाण्याच्या शोधण्याच्या भानगडीत पडू नये. आगामी काळात मराठा समाज बांधवाना कळेल की आरक्षणाच्या विषयावरून राजकारणी लोक आपली पोळी भाजत आहेत. मराठा समाज आरक्षणात बसत नाही. मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी उभा केला आहे,” असे सदावर्ते म्हणाले. ते वसईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या – Ramdas Kadam

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत