एमएस धोनीला आदर्श मानणारा असं करुच शकत नाही! कर्णधार हार्दिकवर भडकले नेटकरी

भारतीय संघाने तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज गाठले. टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. मात्र या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) असे कृत्य केले, ज्यामुळे क्रिकेटचाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत.

भारतीय संघासाठी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तुफानी खेळी केली. त्याच्यामुळेच टीम इंडियाला हा सामना जिंकता आला. सूर्याने 10 चौकार आणि 4 लांब षटकारांसह 83 धावा केल्या. त्याच्यामुळे टीम इंडियाच्या मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत आहेत. या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 2 धावांची गरज असताना कर्णधार हार्दिक पंड्या स्ट्राइकवर होता. त्याचवेळी तिलक वर्मा (Tilak Varma) नॉन स्ट्राइक एंडला होता, जो 49 धावांवर खेळत होता. अशा स्थितीत हार्दिक एक धाव काढून टिलकला स्ट्राइक देऊ शकला असता, पण त्याने रोव्हमन पॉवेलच्या चेंडूवर लांबलचक षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला आणि त्यामुळे युवा फलंदाज टिलकला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही.

यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला वाईट म्हणण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, हार्दिक भाईने टिलक वर्माला स्ट्राइक दिली असती आणि त्याने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले असते तर काय झाले असते. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, त्याने हार्दिकसारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही. तर काहींनी एमएस धोनीशी तुलना करत हार्दिकला सुनावले आहे.