हानिकारक लिपस्टिक : लिपस्टिकमध्ये असे काय असते जे शरीरात जाते आणि आजारांना जन्म देते!

असे म्हणतात की लिपस्टिक (lipstick) ही महिलांची पक्की मैत्रीण असते. त्यामुळे तिचा लूक पूर्ण होतो. पण महिलांचे सौंदर्य वाढवणारी लिपस्टिक आरोग्याच्या गंभीर समस्यांनाही जन्म देते.सहसा सर्व महिलांना बाहेर जाण्यापूर्वी लिपस्टिक लावण्याची सवय असते. याशिवाय त्यांना काहीसे अपूर्ण वाटते. पण त्याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. (Lipstick Side Effects)

बिस्मथ ऑक्सिक्लोराईड नावाचे रसायन लिपस्टिकमध्ये संरक्षक म्हणून काम करते. त्यामुळे कर्करोग होण्याची भीती आहे.लिपस्टिक बनवण्यासाठी काही विषारी घटक वापरले जातात. यामुळे, ओठांच्या आजूबाजूच्या भागात खाज सुटण्याची किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.बहुतेक लिपस्टिकमध्ये शिसे आढळते. यामुळे शरीरात उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

Abpच्या एका रिपोर्टनुसार लिपस्टिकमध्ये कार्सिनोजेनिक नावाची सामग्री असते, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.लिपस्टिक जास्त काळ टिकण्यासाठी त्यात मिसळलेल्या रसायनांमुळे खोकला, डोळ्यात जळजळ, घशात घरघर आणि इतर प्रकारच्या ऍलर्जी होऊ शकतात.लिपस्टिकमध्ये कॅडमियम हा घटक वापरला जातो. अशावेळी रोज लिपस्टिक लावल्याने किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते.