Harshvardhan Patil | अजित पवारांना मिळाली हर्षवर्धन पाटलांची साथ, बारामतीत सुनेत्राताईंचे बळ वाढले!

Harshvardhan Patil | बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी इंदापुरात अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमच्यात गेली ३० वर्षे राजकीय संघर्ष जरूर होता. परंतु आमच्यात व्यक्तिगत संघर्ष नव्हता. आता अजित पवार यांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करू, अन् इंदापुरमधून भरघोस मताधिक्य देऊ असा शब्द काल हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी अजित पवारांना दिला.

यावेळी ते म्हणाले की, आपला संघर्ष झाला पण राजकीय होता पण वैयक्तिक नव्हता. सुनेत्रा पवारांना खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. पण कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. दिलेला शब्द पाळण्याचा स्वभाव आमचा आहे, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. दरवेळी आम्ही तुमचे काम करतो पण परत आमचे काय असा प्रश्न कार्यकर्ते यांच्या मनात होता. स्पष्ट भूमिका असली की अडचणी कमी होतात नसली तर अडचणी वाढतात. सुनेत्रा पवार खासदार असल्या पाहिजेत. असेही ते म्हणाले.

इंदापुरात पार पडलेल्या मेळाव्यासाठी सुनेत्रा पवारांसह भाजपचे ज्येष्ठ नेते मारूतराव वणवे, अंकिता पाटील, निहार ठाकरे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, विलासराव वाघमोडे, कृष्णाजी यादव, राजवर्धन पाटील, पांडुरंग शिंदे उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला