मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना (Corona) व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या व्हेरिएंट करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा असून तो अधिक घातकही आहे. नुकतंच B.1.1.529 या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने ओमीक्रोन (Omicron Variant) असं नाव दिलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील या विषाणू बद्दल चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन हा विषाणू सध्याच्या विषाणूपेक्षा चारपट वेगाने पसरत आहे. आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग ओळखता येऊ शकतो. लसीकरणाला हा विषाणू एस्केप करतो का ? हे पाहावं लागणार आहे. मी केंद्राला दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची यादी काढली जात आहे. या देशातून येणारे विमान थांबवले पाहिजेत. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतं. या मागणीवर सध्या काही निर्णय झालेला नाही, असे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आवाहन केले आहे.
तर, लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM