Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

PM Modi Mother Dies: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन झाले आहे (Heeraben Modi Passes Away ). 100 वर्षीय हीराबेन यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. हीराबेन यांना बुधवारी (२८ डिसेंबर २०२२) प्रकृती अस्वास्थ्यामुळे यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, पीएम मोदींनी स्वतः ट्विट करून आईच्या निधनाची माहिती दिली (PM Modi himself tweeted about the death of his mother) . काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

शोक व्यक्त करताना गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले की, “हीरा बा यांनी कुटुंब वाढवण्यासाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांचे त्यागाचे तपस्वी जीवन सदैव आपल्या स्मरणात राहील. या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण देश पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे. करोडो लोकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.