PM Modi त्यांच्या आईच्या निधनानंतरही पूर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार

PM Modi Mother die : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन झाले. 100 वर्षीय हिराबेन यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने शेअर केली आहे.

पीएम मोदींच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करून आपल्या आईच्या निधनाची माहिती देशाला दिली. पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले आहेत.(PM Modi will attend pre-scheduled events even after his mother’s death)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा बंगाल दौरा आधीच निश्चित होता. पंतप्रधान हावडा, कोलकाता आणि नमामि गंगे अंतर्गत रेल्वेच्या इतर विकासकामांना भेट देणार होते आणि वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवणार होते. पीएमओने सांगितले की, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होऊ शकतात.