मानसी नाईक अन् प्रदीप खरेराच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Mansi Naik: ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ फेम मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हिच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. आपल्या अभिनयासहच एकाहून एक सुंदर फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते. हीच मानसी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात मतभेद निर्माण झाले असून ते घटस्फोट (Mansi Naik Divorce) घेणार असल्याच्या चर्चा आहेत. मानसीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गेल्या काही दिवसांत झालेल्या बदलांमुळे आणि नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Mansi Naik Instagram Account) प्रदीपसोबतचे फोटो डिलीट केले आणि तिने खरेरा आडनावही डिलीट केले आहे. यामध्ये मानसीने काही दिवसांपूर्वी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे (Mansi Naik Social Media Post) तिच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. आता तिने आणखी एक पोस्ट टाकून कवितेतून आपली चर्चा उघडली आहे.

मानसीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर करत एक कविता पोस्ट केली आहे. फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणे खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहे. परंतु पोस्टखाली लिहिलेल्या कवितेवरून तिच्या हृदयातील दु:ख जाणवते. या कवितेत तिने देव आणि जीवनाबद्दल लिहिले आहे. मानसीच्या या पोस्टनंतर तिचे चाहते तिच्या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. त्याचबरोबर तिच्या कवितेचे कौतुकही करत आहे. या कवितेतून मानसीला नेमके काय म्हणायचे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मानसी आणि प्रदीपने जानेवारी २०२१ मध्येच लग्नगाठ बांधली होती.