Rishabh Pant Accident: ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात,कार जागीच जळून खाक; जाणून घ्याआता कशी आहे त्याची तब्येत 

Rishabh Pant Accident: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे . रुरकीला परतत असताना रुरकीच्या गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. पंतच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (Some videos and some pictures of Rishabh Pant’s accident) भारतीय स्टार क्रिकेटरची काही छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यात गंभीर जखमा दिसत आहेत.( Rishabh Pant Accident latest update)

ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. या अपघातानंतर त्यांच्या गाडीला भीषण आग लागली. अपघातानंतर पंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्लास्टिक सर्जरी होणार आहे.(How did Rishabh Pant’s accident happen?)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला जखमा झाल्या आहेत. माहिती मिळताच ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुरकीहून दिल्लीला पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली आणि आग लागली. मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणण्यात आली.