Shrikant Shinde | कुख्यात गुंडाच्या शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; राऊत म्हणाले, “गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!”

Criminal Hemant dabhekar met MP Shrikant Shinde :  कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची त्यांच्या वाढदिवाच्या दिवशी भेट घेतली असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. वर्षा बंगल्यावर दोघांचाही भेट घडली. दोघांच्याही भेटीचा फोटो व्हायरल होत असून श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील टीका होत आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत गुंडाराज अशी टीका केली आहे. या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून, या मुद्द्यावर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट टाकत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!, अशा खोचक शब्दांत राऊतांनी फडणवीसांना सुनावले आहे.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा