Maulana Salman Azhari | हजारोंच्या गर्दीतून मौलाना अजहरीला घेऊन गुजरात ATS जुनागढला रवाना; वाचाळपणा भोवला

Maulana Salman Azhari : गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) रविवारी (४ फेब्रुवारी) मुंबईस्थित इस्लामिक धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अझहरी (Maulana Salman Azhari) याला गुजरातमधील जुनागढमध्ये द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. जुनागडमध्ये काही दिवसांपूर्वी दिलेल्या भाषणानंतर गुजरात पोलिसांनी मुस्लिम मौलाना आणि इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी रविवारी संध्याकाळी मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतले.

मुफ्ती सलमान अजहरी यांना मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांच्या जमावाने पोलीस ठाण्याला बाहेरून घेराव घातला होता. सध्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मौलानाच्या वकिलाने सांगितले की, मुफ्ती सलमान तपासात सहकार्य करण्यास पूर्णपणे तयार आहेत. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जुनागडमध्ये मुफ्ती सलमान अजहरी यांनी भाषण देताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात एटीएसने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना मुंबईतून अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी मलिक आणि हबीब या आयोजकांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा