Shrikant Shinde | कुख्यात गँगस्टरच्या श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वर्षा बंगल्यावर घडली भेट

Criminal Hemant dabhekar met MP Shrikant Shinde : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांची कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी भेट घेतल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ही घटना ताजी असतांना कुख्यात गुंड हेमंत दाभेकर (Hemant Dabhekar) याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची त्यांच्या वाढदिवाच्या दिवशी भेट भेटली असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

दोघांच्याही भेटीचा फोटो व्हायरल होत असून पार्थ पवार यांच्या प्रमाणे श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील टीका होत आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत गुंडाराज अशी टीका केली आहे. या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून, या मुद्द्यावर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

कोण आहे हेमंत दाभेकर? 
हेमंत दाभेकर हा कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा अंत्यत जवळचा मानला जातो. शरद मोहोळचा राईट हॅन्ड अशी त्याची ओळख आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणात शरद मोहोळ सोबतच हेमंत दाभेकर हा देखील आरोपी होता, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा